झेंडूच्या बीजांपासून लग्नपत्रिका
झेंडूच्या बीजांपासून लग्नपत्रिका
आरोटे-डुंबरे पाटील कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक लग्न सोहळा
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : भाग्यश्री आरोटे आणि डुंबरे पाटील यांचे चिरंजीव सुशांत यांच्या विवाह समारंभात सुशील आरोटे यांच्या पर्यावरणपूरक आणि सर्जनशील संकल्पनेतून एक आगळीवेगळी, निसर्गप्रेमाचा संदेश देणारी संपूर्ण संकल्पना साकारण्यात आली. या समारंभासाठी झेंडूच्या बीजांनी युक्त लाकडामुक्त कागदावर तयार केलेली खास लग्नपत्रिका पाहुण्यांना वितरित केली. ही पत्रिका फेकण्याऐवजी कुंडीत लावता येईल आणि त्यातून झेंडूचे फूलझाड उगवेल, असा सकारात्मक आणि कृतीशील संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. अक्षतादेखील पारंपरिक पद्धतीऐवजी तुळशीच्या बीजांनी समृद्ध असलेल्या ‘सिड पेपर’मध्ये पॅक केली होती. ही अक्षता मातीमध्ये पेरल्यास तुळशीचे रोप उगवते. ‘फेकू नका, लावा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हेच या संकल्पनेमागील मुख्य उद्देश होता.
विवाह समारंभात आलेल्या सर्व पाहुण्यांना परतफेडीच्या भेटवस्तू म्हणून २४ तास ऑक्सिजन निर्माण करणारे आणि पर्यावरण शुद्ध करणारे “स्नेक प्लांट” रोपे वितरित करण्यात आली. प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर केला. ‘प्रकृतीविना जीवन अशक्य आहे’ हा संदेश समाजासमोर प्रभावीपणे मांडण्यात आला.
प्रमिला आरोटे यांनी सांगितले की, “निसर्ग संवर्धन हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा कृतींची अत्यंत गरज आहे. तर पर्यावरणप्रेमी नीता आरोटे यांनी या वेळी म्हटले की, “निसर्गाचा समतोल राखणे व पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विवाहासारख्या मंगलप्रसंगी पर्यावरणपूरक विचार रुजवणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येकाने एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे आणि हरित क्रांतीत आपला मोलाचा वाटा द्यावा, हीच आरोटे आणि डुंबरे कुटुंबाची पवित्र भावना आहे.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.