उदंचन पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवा
उदंचन पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवा
अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः संपूर्ण मुंबई महानगरात पाणी साचण्याची ३८६ ठिकाणे आढळून आली आहेत. याठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गतवर्षी ४८२ उदंचन पंपाची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारल्यामुळे तसेच सुधारणा कामांमुळे यंदा ४१७ उदंचन पंपांची आवश्यकता भासणार आहे. हे उदंचन पंप पावसाळ्यात बंद पडता कामा नयेत. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहिली पाहिजे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
अभियंत्यांनी अनुभवाच्या आधारावर पाणी साचण्याची ठिकाणे पूरमुक्त करावीत, कामामध्ये नावीन्यता आणावी, गाळ उपसा व वहन प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहावे, त्रुटी आढळली तर कंत्राटदारांसमवेत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असा इशारादेखील बांगर यांनी दिला.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी व मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी अभिजित बांगर पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणांना शनिवारी (ता. १०) भेट दिली. त्यात वाकोला नदी (कनाकिया पूल), एस.एन.डी.टी. नाला (गझधरबंद उदंचन केंद्र), ओशिवरा नदी (मालाड), पिरामल नाला (गोरेगाव पश्चिम), रामचंद्र नाला (मालाड पश्चिम) आदी ठिकाणांचा समावेश आहे.
पाहणीची सुरुवात पश्चिम उपनगरमध्ये वाकोला नदी येथून झाली. वाकोला नदी प्रवाहाच्या खालील बाजूला मिठी नदीला जाऊन मिळते. वाकोला नदीला ११ ठिकाणी पूरप्रतिबंधक दरवाजे बसवण्यात आले आहेत. गतवर्षी पावसाळ्यात गोळीबार परिसरातील डिझेल जनरेटर पंप बंद पडला होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती.
फिरते उदंचन पंप तयार ठेवावेत. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी कमी असला पाहिजे. जेणेकरून मोबाईल उदंचन पंप अथवा डिझेल जनरेटर संच तातडीने घटनास्थळी पोहोचवता आले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. जेथे आवश्यक त्याच ठिकाणी उदंचन पंप कार्यान्वित करावेत, विनाकारण खर्च नको, असेदेखील बांगर यांनी नमूद केले.
पर्यायी व्यवस्था करा!
अभिजित बांगर म्हणाले, की उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर संच तातडीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. त्या परिसरातील १२ उदंचन पंपांचा एक गट तयार करून पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनआधारित एक डिझेल जनरेटर संच उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.