रायगडचा दहावीचा ९६.२५ टक्के निकाल

रायगडचा दहावीचा ९६.२५ टक्के निकाल

Published on

रायगडचा दहावीचा ९६.२५ टक्के निकाल
मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल‌ मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३१ टक्के आहे. रायगड जिल्ह्यात दहावी परीक्षेत रोहा तालुक्याने बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातून ३५ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ३९४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले.‌ यामधील ३४ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एक हजार ३२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के इतके आहे.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभिनंदन केले असून, परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थांनी खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करून यश प्राप्त करावे, असा सल्ला दिला आहे.

तालुकानिहाय निकाल :
रोहा - ९७.१२ टक्के
पनवेल - ९६.८८ टक्के
उरण - ९५.७८ टक्के
कर्जत - ९६.६८ टक्के
खालापूर - ९३.७५ टक्के
सुधागड- ९१.२८ टक्के
पेण- ९५.४९ टक्के
अलिबाग - ९६.७६ टक्के
मुरूड- ९६.१९ टक्के
माणगाव - ९६.४८ टक्के
तळा - ९६.४० टक्के
श्रीवर्धन - ९५.८३ टक्के
म्हसळा- ९५.५३ टक्के
महाड- ९७.०७ टक्के
पोलादपूर - ९५.०७ टक्के

----------

अंजुमनचा १०० टक्के निकाल
म्हसळा (बातमीदार) ः शहरातील अंजुमन विद्यालयाचा निकाल १०० टक्‍के लागला असून, रुमाना इर्शाद खान (८८.६०), बरीरा मंजूर घरटकर (८८.४०), सफिया मौला अली अर्जुनगी (८३. ४०), नूजत नविद अंजुम पांगारकर आदींसह १७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. प्रथम श्रेणीत ३९, द्वितीय श्रेणीत ५२ विद्यार्थी यशस्वी झाले. न्यू इंग्लिश शाळेतील कृष्णा किशोर अडसूळ याला ९३.६० टक्‍के गुण मिळाले, तर श्रीपाद स्वप्नील लाड याला ८४.४०, सलोनी सुरजन जैस्वाल हिला ८३.६० टक्‍के, मागासवर्गीयमध्ये प्रथम स्वप्नील लाड याला ८४. ४० टक्‍के गुण मिळाले. विद्यार्थ्यांचे तहसीलदार सचिन खाडे, पोलिस निरीक्षक संदीप कहाले, गटविकास अधिकारी माधव जाधव, गटशिक्षधिकारी रमेश चव्हाण, नगराध्यक्ष संजय कर्णिक, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

...................

साबळे विद्यालयाचा निकाल १०० टक्के

माणगाव (बातमीदार) ः माणगाव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशोक दादा साबळे विद्यालयाचा निकाल दरवर्षी उंचावत असून, यंदाही १०० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५८ विद्यार्थी बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. यात शांती देवीलाल कुमावत हिने ९०.६० टक्‍के, साक्षी भाऊसाहेब घोरपल्ले ९०.०० टक्‍के, सांची शिवशंकर मुंडे ८९.६० टक्‍के हिने गुण मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सचिव कृष्णा भाई गांधी, शाळा समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, संचालक नितीन बामगुडे, मुख्याध्यापक धनाजी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप उभारे यांनी अभिनंदन केले.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com