जिल्ह्यात एफटीके पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम
जिल्ह्यात एफटीके पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः जलस्रोतांची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासणी करण्यासाठी १२ मे ते ७ जून या कालावधीत जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संच (एफ. टी. के.)द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व १८३१ गावांमध्ये ही मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ, शुद्ध गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवताविषयक एफ. टी. के. प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ. टी. के. किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, ८ वी ते १० वीमधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळजोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यूक्यूएमआयएस पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणीपुरवठा योजना स्रोत, घरगुती नळजोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ. टी. के. संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहे.
.......................
चौकट :
काय आहे क्षेत्रीय तपासणी संच?
एफ. टी. के. म्हणजे क्षेत्रीय पाणी तपासणी संच आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे. यामध्ये पीएच स्तर, क्लोरीन, नायट्रेट, क्लोराइड, लोह, अल्कलिनिटी, गढूळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच जैविक प्रदूषणबाबत तपासणी केली जाते. याचा प्राथमिक स्तरावर लगेच निकाल मिळतो. या संचाद्वारे पाणीपुरवठा स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळ जोडण्याची पाणी गुणवत्ता तपासली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.