महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार
पनवेल, ता. १७ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने पनवेलमध्ये राहणाऱ्या एका महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिला पोलिसाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलिस उपनिरीक्षक सध्या वाशी पोलिस ठाण्यात कार्यरत असून, २०२०मध्ये तो तळोजा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याची पीडित महिला पोलिसाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर मार्च २०२०मध्ये त्याने चहा पिण्याच्या बहाण्याने पीडितेला पनवेलमधील नेरे, महालक्ष्मीनगर येथील आपल्या भावाच्या खोलीवर नेले. तेथे त्याने चहामध्ये गुंगीकारक औषध मिसळून पीडितेला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर या घटने वेळी तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प बसवले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षकाने पीडितेला लग्नाच्या भूलथापा देत एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ दरम्यान पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.
-------------------
पाच लाख उकळले
आरोपीने चारचाकी वाहन घेण्यासाठी पीडितेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो मुलाला दाखवण्याची धमकी देऊन पीडितेकडून दोन लाख रुपये ऑनलाइन आणि तीन लाख रुपये रोख स्वरूपात उकळले.
--------------
आरोपीची आई सहआरोपी
आरोपीचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर पीडितेने लग्नाची मागणी केली असता, या पोलिस उपनिरीक्षकाने तिच्या मुलाच्या वयाचा संदर्भ देत तिला जातीवाचक अपशब्द वापरले आणि अपमानित केले. त्यामुळे पीडितेने याबाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षकाच्या आईला दिली असता, तिनेदेखील पीडितेला जातीवरून शिवीगाळ केली आणि तिचा अपमान केला. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.