- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

Published on

आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. या बैठकीत राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत समावेश करणे तसेच त्यांचे मानधन वाढीचा प्रस्ताव लवकर सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या शासन निर्णयाचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा असावा. आठ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या समुपदेशाने करण्यात याव्यात. त्यानंतर विनंती बदल्या करण्यात याव्यात. तसेच एस-२३ या वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांचे रिपोर्ट कार्ड पाहून करण्यात याव्यात. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या ३१ मेपूर्वी प्रथमत: आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्यात. त्यांना सोयीचा जिल्हा देण्यात यावा. त्यानंतर जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात याव्यात अशा सूचनाही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या.
...
सुधारणा विधेयक सादर करा!
शासनाला जास्तीत जास्त वर्ग १चे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील, यासाठी एमपीएससीकडे पाठपुरावा करून ही पदे तातडीने भरावीत. बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट व इतर कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी लीगल फर्मची नियुक्ती करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत पावसाळी अधिवेशनामध्ये या कायद्यामधील सुधारणा विधेयक सादर करण्याचे निर्देश मंत्री आबिटकर यांनी या बैठकीत दिले. तसेच कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
...
कृती आराखडा सादर करा
१५० दिवसांचा कृती आराखडा सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार करून २० मेपर्यंत सादर करावा. १७ ठिकाणी कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करणे तसेच टीबीमुक्त पंचायत व तंबाखूमुक्त शाळा हे अभियान सुरू करावे, अशाही सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com