मुख्यमंत्री सहायता निधी ठरतेय गरजूंसाठी वरदान
मुख्यमंत्री सहायता निधी ठरतेय गरजूंसाठी वरदान

मुख्यमंत्री सहायता निधी ठरतेय गरजूंसाठी वरदान मुख्यमंत्री सहायता निधी ठरतेय गरजूंसाठी वरदान

Published on

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतोय गरजूंसाठी वरदान
मुंबई व उपनगरांतील ५२५ रुग्णांना ४.९५ कोटींची आर्थिक मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिलासादायक ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत केवळ मुंबई व उपनगरांतील एकूण ५२५ रुग्णांना चार कोटी ९५ लाख रुपये इतकी आर्थिक मदत या निधीतून प्रदान करण्यात आली आहे.
या कालावधीत मुंबई शहरातील ३२८ व उपनगरांतील १९८ रुग्णांना लाभ मिळाला आहे. सर्वाधिक रुग्णांनी कर्करोग शस्त्रक्रियेसाठी (९५ रुग्ण) निधीचा लाभ घेतला असून, त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना एक प्रकारचे वरदान ठरत आहे, अशी भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिकांच्या वैद्यकीय गरजांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजनेबाबत राज्यभरातून समाधान व्यक्त होत असून, निधी वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व वेग वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

सर्वाधिक मदत मिळालेल्या आजारांचे तपशील :
- कर्करोग – ९५
- मेंदूच्या आजारांवरील उपचार – ४६
- कर्करोगावरील केमोथेरपी/ रेडिएशन – ३९
- हिप रिप्लेसमेंट – ३०
- हृदयविकारावरील उपचार – २९

सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये

मुंबई शहर :
- सैफी हॉस्पिटल – ९ रुग्ण
- बॉम्बे हॉस्पिटल अँड खुबचंदानी कॅन्सर सेंटर – ८
- हिंदुजा हॉस्पिटल – ८
- रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल – ७
- जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर – ७

मुंबई उपनगर :
- साई मेडिकेअर अँड साई हॉस्पिटल, चेंबूर – ३०
- आरएमएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कांदिवली – २९
- स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजी, घाटकोपर – २६
- होली स्पिरिट हॉस्पिटल, अंधेरी – २०
- बेंझ मल्टीस्पेशालिटी, सांताक्रूझ – १६

मदतीचा वाढता आलेख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मदतकार्याचा आलेख सातत्याने वाढत आहे. गरजू रुग्णांसाठी ही योजना परिणामकारक ठरत आहे.

अशी झाली मदत
डिसेंबर २०२४ : १,३९२ रुग्ण – १२ कोटी २१ लाख रुपये
- जानेवारी २०२५ : १,७८८ रुग्ण – १५ कोटी ८१ लाख २७ हजार रुपये
- फेब्रुवारी २०२५ : २,०७० रुग्ण – १८ कोटी ३४ लाख रुपये
- मार्च २०२५ : २,५२१ रुग्ण – २२ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये
- एप्रिल २०२५ : २,४३० रुग्ण – २१ कोटी ३२ लाख रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com