दारूमुक्त खारघरसाठी आमदारांचा निर्धार

दारूमुक्त खारघरसाठी आमदारांचा निर्धार

Published on

खारघर, ता. २० (बातमीदार) : खारघर शहर दारूमुक्त व्हावे, यासाठी सहयोग सेवाभावी संस्था आणि खारघरमधील नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या अंतर्गत रविवारी (ता. १८) खारघरमध्ये सांकेतिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि दारूमुक्त खारघरसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्य सरकारने खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे, यासाठी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. २००७ पासून समितीने मोर्चे, आंदोलने आणि सरकारकडे पत्रव्यवहार केले आहेत. याच मागणीसाठी १८ मे रोजी खारघरमधील शिल्प चौकात एकदिवसीय सांकेतिक उपोषण आयोजित करण्यात आले होते, ज्याला खारघरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खारघर शहराला दारूमुक्त करण्याची मागणी येथील नागरिक मागील दोन दशकांपासून करत आहेत; मात्र उत्पादन शुल्क विभाग लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून दारूविक्रीचे परवाने वाटप करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वेळी आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, ॲड. नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे, वासुदेव पाटील, समीर कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, अमर उपाध्याय यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com