बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यपाऱ्यांची धावपळ

बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यपाऱ्यांची धावपळ

Published on

रोहा, ता. २१ (बातमीदार) ः रोहा तालुक्यासह माणगाव, महाड आणि तळा तालुक्याला पावसाने चांगलाच दणका दिला. वादळी वारा व ढगांच्या गडगडाटासह आलेल्‍या पावसाने शहर व लगतच्या चणेरा, भालगाव, कोलाड, सुतारवाडी, नागोठणे, सुकेळी खिंड अशा काही ठिकाणी अक्षरशः थैमान घातले होते. रोहा बाजारपेठेतील बोरी गल्लीत पाणी तुंबले होते. व्यापाऱ्यांच्या घरातही पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. बुधवारी सकाळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली.
पुढील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील, असे इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्‍याने चाकरमानी आपल्या गावी आले आहेत. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्‍याने अनेकांची धावपळ उडाली. ग्रामीण भागात नागरिकांची उन्हाळ्यात बाहेर ठेवलेली लाकडे भिजून गेली. ही लाकडे प्लॅस्‍टिक ताडपत्रीने झाकून ठेवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. शहरातील बोरी गल्लीतील गटारे तुडुंब भरून वाहत होती. गटारातून पाण्याचा निचरा वेळीच न झाल्यामुळे पाणी थेट दुकानात तर काही लोकांच्या घरात शिरल्याने दिसले.

रोहा : बोरी गल्लीतील तुंबलेली गटारे साफ केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
-------------------

लग्न समारंभात विघ्न
रोहा (बातमीदार) ः सध्या लग्‍नसराई सुरू असून मेहंदी, हळद, विवाहसोहळा, संगीत असे कार्यक्रम धूमधडाक्‍यात साजरे करण्यात येत आहेत. पावसामुळे लग्‍नसमारंभात विघ्‍न येत आहेत. बुधवारी सायंकाळी आलेल्‍या जोरदार पावसामुळे घरासमोर उभारलेला मंडप भिजला. त्‍यामुळे वऱ्हाडी मंडळीची तारांबळ उडाली.
मुंबई, ठाणे, पालघर ते अगदी तळ कोकणापर्यंत विवाह समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्याची बहुजन समाजाची परंपरा चालू आहे. त्या दृष्टीने यजमान मंडळीही लग्न समारंभात कोणतेही विघ्न येऊ नये, या दृष्टीने जय्यत तयारी करताना दिसतात. परंतु पावसामुळे नियोजन बिघडत आहे. लग्‍नघरात आनंदाचे वातावरण आहे. या आनंदावर पावसामुळे विरजण पडल्‍याचे दिसून येत आहे.

रोहा : पावसामुळे मंडप भिजल्‍याने नुकसान झाले.

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com