कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट तपासनीस

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट तपासनीस
Published on

बनावट तिकीट तपासनिसाला अटक
कल्याण, ता. २२ (बातमीदार) : लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीस असल्याचे भासवून रेल्वे प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही गोष्ट साध्या वेशात याच एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची तिकिटे तपासणाऱ्या मध्य रेल्वेच्या दुसऱ्या एका तिकीट तपासनिसाला आढळली. या वेळी इतर तिकीट तपासनिसांकडेही याबद्दल विचारणा केल्यावर हा व्यक्ती तोतया असल्याचे आढळून आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. रामप्रकाश रामजीवन मंडल (४०) असे अटक केलेल्या बनावट तिकीट तपासनिसाचे नाव आहे. तो विरार येथील बोळिंज भागातील टेलिकाॅम एक्स्चेंजजवळील मंडल इमारतीत राहतो. मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट तपासनीस हरेश किसन दहिलकर (५३) यांनी या वेळी या बनावट तिकीट तपासनिसाविरुद्ध कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com