वसईतील कांदळवन तोड प्रकरणी दोन वर्षात २१ गुन्हे दाखल
वसईतील कांदळवन तोडप्रकरणी दोन वर्षांत २१ गुन्हे दाखल
विरार, ता. २३ (बातमीदार) ः वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामाचा मोठा बोलबाला आहे. सरकारी जागेवर अतिक्रमण होत असल्याचे पुढे येत असतानाच कांदळवनाच्या जागेवरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे भूमाफिया करत असल्याचे समोर आले आहे. याविरोधात तसीलदार अविनाश कोष्टी यांनी मोहीम उघडली असून, गेल्या दोन वर्षांत कांदळवन नष्ट करणाऱ्यांविरोधात २१ गुन्हे दाखल झाले आहेत आणि तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचनामा मोहीम सुरू असून, महसूल यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या जलसंकटाने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल १२ दिवस महामार्ग पाण्याखाली होता. यामागील प्रमुख कारण म्हणजे महामार्गालगत अनधिकृत माती भराव व कांदळवनाची कत्तल होते. पालघरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. प्रशासनाच्या तात्पुरत्या कारवाईनंतरही भूमाफियांनी पुन्हा एकदा अनधिकृत माती भराव व बांधकामे वेगात सुरू केली आहेत.
मोहीम अधिक तीव्र करणार
यंदा पावसाळा जोरदार होण्याचा हवामान खात्याचा इशारा असल्याने अनधिकृत माती भराव व महामार्गाचे लगत असलेल्या कांदळवनाची होणारी कत्तल यामुळे पुन्हा महामार्ग जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी महसूल यंत्रणेला अलर्ट करत मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू असलेली मोहीम ही भूमाफियांना चांगलाच दट्ट्या देणारी ठरत आहे. आतापर्यंत या ठिकाणी कांदळवन तोडप्रकरणी २१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा तहसीलदारांनी दिल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.