कासारवडवली उड्डाणपुलाचे काम ५ जूनपर्यत पूर्ण करा

कासारवडवली उड्डाणपुलाचे काम ५ जूनपर्यत पूर्ण करा
Published on

कासारवडवली उड्डाणपुलाचे काम ५ जूनपर्यंत पूर्ण करा
- महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. अवकाळीच्या सरी कोसळत आहेत. अशातच माॅन्सूनपूर्व सुरू असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत, कासारवडवली उड्डाणपुलाचे काम ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.
पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचीही आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. या वेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभाग, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, विद्युत महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे ३० मेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित प्राधिकरणांना दिले. पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील, या दृष्टिकोनातून या रस्त्याची सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

ड्रेनेज, कलव्हर्टच्या साफसफाईचे काम सुरू
पावसाळ्यात घोडबंदर रोडवरील पाणी साचू नये, यासाठी सर्व ड्रेनेज लाइन व कलव्हर्टची साफसफाई सुरू आहे. तसेच जुन्या ड्रेनेज लाइन या नवीन ड्रेनेज लाइनला जोडण्याचे काम सुरू असून, ३० मे पूर्वी सर्व ड्रेनेज लाइन व कलव्हर्ट साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com