सानपाडा उद्यानातील वृक्षांची छाटणी करा

सानपाडा उद्यानातील वृक्षांची छाटणी करा
Published on

नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : सानपाडा विभागात सात उद्याने असून, या उद्यानातील वृक्षांची छाटणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे विभागप्रमुख बाबाजी इंदोरे यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. सानपाडा परिसरात महापालिकेची अनेक उद्याने आहेत. या उद्यानातील वृक्षांच्या फांद्या उद्यानालगतच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये, रस्त्यांवरदेखील पसरल्या आहेत. उद्यानात नागरिक येत असतात. अनेक जण आपली वाहने रस्त्यालगत उभी करतात; तर उद्यानात फिरण्यासाठी येणारे नागरिक झाडांचा आधार घेऊन येथे बसतात. काही जण पावसापासून रक्षण करण्यासाठी झाडांखाली उभे राहतात, लहान मुले उद्यानात पावसातदेखील खेळत असतात. अशात एखाद्या झाडाची फांदी कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी उद्यानातील, तसेच उद्यानाबाहेर पसरलेल्या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी बाबाजी इंदोरे यांनी पालिकेकडे केली आहे. पालिकेच्या वतीने बऱ्याच ठिकाणी उद्यानाबाहेरील काही फांद्यांची छाटणी केली असली तरी उद्यानाअंतर्गत असलेल्या वृक्षांची छाटणी करणे गरजेचे असल्याचे बाबाजी इंदोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com