नेरूळ स्थानक परिसरात मद्यपींचा उपद्रव

नेरूळ स्थानक परिसरात मद्यपींचा उपद्रव
Published on

नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला प्रवेशद्वाराजवळच संध्याकाळी फेरीवाले बेकायदा व्यवसाय थाटत आहेत. यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फेरीवाल्यांमधून वाट काढावी लागत असतानाच त्याच भागात मद्यपींच्यादेखील पार्टी सुरू असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे रेल्वे आणि सिडकोचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप संतप्त प्रवाशांकडून करण्यात आला आहे.
दररोज संध्याकाळी रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागातील प्रवेशद्वारावर अनेक फेरीवाले बेकायदा आपला व्यवसाय थाटतात. रेल्वेस्थानक कॉम्प्लेक्समध्ये वाइन शॉप असून, या परिसरात अनेक मद्यपी उघड्यावर मद्यपान करत असतात. या परिसरात भिकाऱ्यांसह गर्दुल्ल्यांचीदेखील वर्दळ वाढली आहे. रेल्वेस्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या गर्दीतून वाट काढावी लागत असून, यामुळे प्रामुख्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे पोलिस, महापालिका, सिडको आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांसह वाइन शॉपवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सिडकोने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु नेरूळ स्थानक परिसरात वाढलेले फेरीवाले, मार्जिनल स्पेसवर व्यवसाय करणारे खाद्यपदार्थ विक्रेते, मद्यपी, गर्दुल्ले यांच्यावर कारवाईकडे सुरक्षा रक्षकांकडून जाणीवपूर्व दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com