रस्‍त्‍यांची कामे वेळत करा, अन्यथा आंदोलन

रस्‍त्‍यांची कामे वेळत करा, अन्यथा आंदोलन
Published on

रस्‍त्‍यांची कामे वेळत करा, अन्यथा आंदोलन
राष्‍ट्रवादी काँग्रेसचा इशारा
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः मुंबईतील रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्‍याची ग्‍वाही पालिका आयुक्तांनी दिली होती, मात्र रस्‍त्‍यांची कामे संथ गतीने सुरू आहेत, असा आरापे करीत राष्‍ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील तब्बल दोन हजार १२१ रस्त्यांपैकी केवळ ४७९ रस्त्यांचेच काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच उर्वरित एक हजार ६०० पेक्षाही अधिक रस्ते अजूनही अपूर्ण काम झालेल्‍या अवस्‍थेत आहेत. त्‍यातच अवकाळी पावसाने या समस्‍येत अधिकच भर पडली आहे. पालिका आयुक्तांनी फेब्रुवारीमध्ये एका बैठकीत ३१ मे पर्यंत कामे पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट आदेश दिले होते, मात्र त्‍या गतीने काम पूर्ण होत नसल्‍याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मुंबई राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे. आयुक्तांच्या आदेशांना डावलून कामे रखडवणाऱ्या कंत्राटदारांवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्‍यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com