मालमत्ता कराची बिले घरपोच

मालमत्ता कराची बिले घरपोच
Published on

वाशी, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या मालमत्ता कर देयकांच्या घरपोच वितरणास २३ मेपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नोंदणीकृत बचत गटांतील महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बचत गटांच्या महिलांना महापालिकेच्या वतीने या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपातील ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
बचत गटातील महिलांना खासगी व सरकारी सोसायट्या, वसाहती व गृहसंकुलांमध्ये प्रत्येक घरापर्यंत विनाअडथळा प्रवेश दिला जावा, त्यांच्याकडून मालमत्ताकर देयक स्वीकारावे व मालमत्ताधारक किंवा त्यांच्या भाडेकरूंनी संबंधित महिला प्रतिनिधींना आपल्या माहितीचे डिजिटायझेशन करण्यासाठी मालमत्ताधारकाचे संपूर्ण नाव, वापरात असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ही माहिती संपूर्ण व अचूक स्वरूपात द्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. मालमत्ता कराची बिले वितरित करण्यासाठी बचत गटांतील महिलांना मालमत्ताधारक किंवा त्यांच्या भाडेकरूंनी मालमत्ता धारकाचे संपूर्ण नाव, वापरात असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ही माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती मालमत्ता कर विभागाच्या डिजिटल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात मालमत्ता कर, कराविषयीच्या सूचना व त्याविषयीचे पेमेंट रिमाइंडर मोबाईलवर सहजपणे मिळू शकतील.
-------------------
सन्मानपूर्वक वागणूक द्या!
बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देणे अपेक्षित आहे. मालमत्ताधारकास महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे न लागता घरबसल्या ऑनलाइन मालमत्ता कर भरता यावा, यादृष्टीने मालमत्ताधारकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रत्येक मालमत्ताधारकाची माहिती बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना उपलब्ध करून देऊन नागरिकांना डिजिटायझेशनद्वारे सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com