

सुधारणा मोहिमेत ‘ठाणे प्रादेशिक’ प्रथम
राज्य सरकारच्या मोहिमेत लातूर द्वितीय, पिंपरी-चिंचवड तृतीय
ठाणे शहर, ता. २४ : राज्य सरकारने राबविलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यात अव्वल ठरले आहे. प्रशासकीय कामकाजात आवश्यक सुधारणा आणि आधुनिकता आणून या कार्यालयाने पाहिला क्रमांक मिळवला आहे. २३ मे रोजी हा निकाल जाहीर झाला.
ठाणे कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कामात अनेक सकारात्मक बदल घडवण्यात आले. येथे येणाऱ्या लोकांची कामे अधिक गतीने आणि विना रांग व्हावेत यासाठी आधुनिकता आणली आहे. परिसरात स्वच्छता आणि टापटीपपणा आणला आहे. प्रत्येक खिडकीवर संबंधित ऑनलाइन व फेसलेस कामासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत.
------------------------------------
आधुनिक सुविधांची दखल
कार्यालयातील जुने भंगार साहित्य, कालबाह्य कागदपत्रे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. जप्त वाहनांचा लिलावही करण्यात आला. ‘आपले सरकार’ व ‘पीजी पोर्टल’वरील तक्रारी वेळेत सोडवल्या जातात. अशी अनेक सकारात्मक कामे करून आधुनिक सुविधांची दखल घेतल्याने हा सन्मान मिळाला असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
----------------------------------
जानेवारी २०२५ मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर, ही आणखी एक सन्मानाची नोंद ठाणे कार्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.