शरद पवार गटाच्या नियुक्त्या जाहीर

शरद पवार गटाच्या नियुक्त्या जाहीर
Published on

शरद पवार गटाच्या नियुक्त्या जाहीर
* सदस्य नोंदणी अभियान राबविणार - सुहास देसाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : पक्षवाढीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे शहरातील विविध सेलच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी नुकत्याच जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त सेलच्या अध्यक्षांना देसाई आणि पाटील यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले. दरम्यान, पक्षवाढीसाठी ठाणे शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सुहास देसाई यांनी सांगितले.
पवार गटाच्या नियुक्तीमध्ये व्यापारी सेल ठाणे जिल्हा अध्यक्षपदी संजीव दत्ता, हॉकर्स सेल ठाणे जिल्हा अध्यक्षपदी विक्रम सिंह, हॉकर्स सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी मनीषा म्हात्रे, सोशल मीडिया सेल ठाणे अध्यक्षपदी आशीष शर्मा, डॉक्टर सेल ठाणे जिअध्यक्षपदी डाॅ. सुभाष यादव, ज्येष्ठ नागरिक सेल ठाणे अध्यक्षपदी दिलीप नाईक, ज्येष्ठ सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप लोखंडे, असंघटित कामगार सेल ठाणे अध्यक्षपदी राजू यशवंत चापले, असंघटित कामगार सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील गुरव, सहकार सेल अध्यक्षपदी नारायण उतेकर, लीगल सेल ठाणे अध्यक्षपदी विनोद उतेकर, शीख समाज सेल अध्यक्षपदी जगत सिंग परोचे, वाल्मिक समाज सेल अध्यक्षपदी हरिवंश चौहान, वाल्मीक समाज सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी हरीओम चौटेला, ग्रंथालय सेल अध्यक्षपदी वर्षा साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना पद नियुक्ती पत्र सुहास देसाई आणि प्रकाश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान, डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आहे. ठाणेकरांमध्ये सत्ताधारी वर्गाविरोधात असंतोष आहे. ठाणेकरांना आपण सक्षम पर्याय देणार असून, त्यासाठी जनमानसांत फिरणार आहोत, शिवाय सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे, असे सुहास देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com