मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी मनसे आक्रमम

मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी मनसे आक्रमम
Published on

मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी मनसे आक्रमक
ठाण्यातील कंपन्यांना काम न देण्याची ठाणे पालिकेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : मुंबई महानगरपालिकेतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या पाच ठेकेदार कंपन्यांना ठाणे पालिकेमध्ये कोणतेही काम देऊ नये, अशी स्पष्ट मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची मागणी पालिकेच्या नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई पालिकेतील ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईडी चौकशी सध्या सुरू आहे. या प्रकरणात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच ठेकेदार कंपन्यांमध्ये अँक्यूट डिझाइनिंग, कैलास कन्स्ट्रक्शन, एन. ए. कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जे. आर. एस. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती मनविसेचे संदीप पाचंगे यांनी दिली.
-------------------------------
दरम्यान, या कंपन्यांनी मुंबईत जे प्रकार केले, तेच प्रकार ठाणे पालिकेच्या विविध प्रकल्पांमध्येही करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कंपन्यांची ठाणे पालिकेतदेखील कोट्यवधींची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कररूपात मिळणाऱ्या निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------
गंभीर त्रुटी
नदी गाळ गैरव्यवहारात फक्त कंत्राटदार नव्हे, तर तीन पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांनी गाळ उपसण्याच्या कामांमध्ये बनावट मोजमापे, खोटे दस्तऐवज आणि चुकीचे बिलिंग यांसारख्या गंभीर त्रुटी केल्या असून, संबंधित प्रकरण सध्या तपासअंतर्गत आहे.
-------------------------------
कंपन्या काळ्या यादीत टाका
गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्यांची कार्यपद्धती व कामांची गुणवत्ता तपासणे आणि त्यांनी केलेल्या सर्व प्रकल्पांचे पुनरावलोकन करणे अत्यावश्यक आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी या पाचही कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, कोणतेही नवीन ठेके दिले जाऊ नयेत, दिलेल्या सर्व कामांचे पुनरावलोकन व तपासणी करावी, कामाचा दर्जा आणि खर्चाचे बिल पडताळावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
------------------------
कोट :-
गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा काम देणे म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी होईल. त्यांच्या कामावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून त्यांचा काळाबाजार रोखावा.
- संदीप पाचंगे, सरचिटणीस, मनविसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com