चिकू बागायतदारांच्या खात्यावर विमा भरपाई जमा

चिकू बागायतदारांच्या खात्यावर विमा भरपाई जमा
Published on

कासा/बोर्डी, ता. २४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील बागायतदारांना अखेर दिलासा मिळाला आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकविमा भरपाईची प्रतीक्षा संपत सुमारे ११०० चिकू बागायतदारांच्या खात्यावर विमा रक्कम जमा झाली आहे. ही भरपाई आमदार विनोद निकोले यांच्या पाठपुराव्याचा परिपाक मानली जात आहे. पावसाळ्याआधी शेतकऱ्यांची मोठी चिंता मिटली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याची उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी व्यक्त केली.

डहाणू रोड येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला आमदार निकोले यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपनीचे प्रतिनिधी गौतम नोगिया आणि सुजय मुकणे, विविध शासकीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, जनता बँकेचे अध्यक्ष मिहीर शहा यांच्यासह मोठ्या संख्येने बागायतदार उपस्थित होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारचा निधी प्राप्त झाला असून, राज्य शासनाकडील हिस्सा प्रक्रियेत आहे, मात्र आमदार निकोले यांच्या दबावामुळे कंपनीने तत्काळ भरपाई प्रक्रिया सुरू केली आणि अवघ्या दोन दिवसांत ११०० शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com