कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी उद्यापासून उपोषण

कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी उद्यापासून उपोषण
Published on

उरण, ता. २४ (वार्ताहर) : राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० मार्च २०२३मध्ये विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकारात्मक निर्णय घेतले होते; परंतु दोन वर्षे होऊनही या सकारात्मक निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. २६) आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्‍यार उपसले आहे. नगरविकास विभाग आणि वित्त विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी मुंबई येथील आझाद मैदानात सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com