

परमवीर चक्र विजेता मार्गाचे नामफलक ४८ तासांत पुन्हा बसवले
मुंबई, ता. २४ ः अंधेरी (पूर्व) चिमटपाडा परिसरातील इनकोनिका हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण ‘परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्ग’ असे करण्यात आले होते. मुंबई महापालिकेने या ठिकाणी नामफलकही बसवले होते, मात्र सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान हा नामफलक हटवण्यात आला. नंतर तो दीर्घकाळ लावण्यात आलेला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडे तातडीने फलक बसवण्याची मागणी केली. त्याची तत्काळ दखल घेत अवघ्या ४८ तासांत त्या मार्गावर पुन्हा नामफलक बसवला गेला. अनिल गलगली यांनी सहाय्यक आयुक्तांचे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.