रेल्वे प्रकल्पाचे काम बंद पाडले

रेल्वे प्रकल्पाचे काम बंद पाडले
Published on

रेल्वे प्रकल्पाचे काम बंद पाडले
रस्ता, नाले आणि खेळाचे मैदान नीट करून द्या; नाहीतर काम बंद; ग्रामस्थांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : पूर्वेतील भोपर गाव येथे रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे गावचा मुख्य रस्ता बंद केला असून, येथील नाल्याचा प्रवाहात भराव टाकण्यात आला आहे. खेळाच्या मैदानाचीदेखील दुरवस्था झाली आहे. या कामामुळे पावसाळ्यात गावात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने पावसाळ्यात रस्ता नीट करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराकडे केले आहे. रस्ता नाले आणि खेळाच्या मैदानाचे काम होत नाही, तोपर्यंत आम्ही काम सुरू करू देणार नाही, असे म्हणत शनिवारी (ता. २४) भोपर ग्रामस्थांनी रेल्वेचे काम बंद पाडले.

भोपर गावात रेल्वेचे डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम सुरू आहे. या कामामुळे गावचा मुख्य रस्ता बंद झाला आहे. नाल्याच्या प्रवाहात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच खेळाच्या मैदानाची दुरवस्था झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रकल्पामुळे खेळाचे मैदान पूर्णपूणे बाधित झाल आहे. त्यामुळे आमच्या गावातील तरुणांना खेळण्यासाठी व गावातील लग्नकार्यासाठी, प्रौढांसाठी विरंगुळाचे ठिकाण राहिलेले नाही. आम्हाला गावासाठी पर्यायी जागा नाही. त्यामुळे प्रकल्पालगत असलेली जागा भोपर गावातील ग्रामस्थांना मंजूर केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मैदान तयार करण्यास ग्रामस्थांना सहकार्य करावे, असे निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com