शहरात पिस्तूल घेऊन फिरणारा ‘बाऊजी’ जेरबंद

शहरात पिस्तूल घेऊन फिरणारा ‘बाऊजी’ जेरबंद
Published on

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (ता. २४) सकाळी एक मोठी कामगिरी केली. स्विफ्ट कारमधून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या तरुणाला शिताफीने अटक करत सुमारे २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध शस्त्रसाठ्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत प्रशंसनीय ठरत असून, शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
उल्हासनगर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी व वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सक्रिय झाले आहे. त्यांनी गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूसांसह एक संशयित व्यक्तीला शुक्रवारी (ता. २३) सकाळी ६.४०च्या सुमारास ताब्यात घेतले. कल्याण-अंबरनाथ रोडवरील महावितरण कार्यालयासमोर ऑर्डनन्स फॅक्टरी कंपाउंडजवळील परिसरात एक व्यक्ती कारमधून पिस्तूल घेऊन फिरत आहे, अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे, दत्तात्रय जाधव, सचिन पाटील, सुशांत हांडेदेशमुख हे घटनास्थळी पोहोचले. संशयिताकडे विचारपूस केली असता त्याचे नाव सचिन ऊर्फ बाऊजी बहादूर करोतिया (वय ३१) असल्याचे स्पष्ट झाले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com