बदलापूरकरांना अल्प दरात मिळणार रुग्णवाहिका

बदलापूरकरांना अल्प दरात मिळणार रुग्णवाहिका
Published on

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : शहरात आरोग्याच्या भेडसावणाऱ्या समस्यांवर हातभार लावण्यासाठी किरण भोईर यांनी पाऊल उचलले आहे. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये, या उद्देशाने भोईर यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कॅन्सर, टीबीसारखे दुर्धर आजार झालेल्या बदलापुरातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जाताना रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यात मिळणाऱ्या रुग्णवाहिकांचा अवाजवी खर्चही सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे बदलापुरातून ठाणे, मुंबई, उपनगरांत उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन भाजप शहराध्यक्ष व माजी नगरसेवक किरण भोईर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त जनसेवेसाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
यापूर्वी शहरात आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष भोईर यांनी किसन कन्याजन्म स्वागत हा उपक्रम राबवत आहेत. त्याचप्रमाणे कॅन्सर आणि टीबी रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम सातत्याने करत आहेत. विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून बदलापुरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कामही किरण भोईर करत असतात. आता आरोग्याच्या बाबतीत शहरातील समस्या ओळखून त्यांनी रुग्णवाहिकेच्या रूपात आदर्श निर्माण केल्याचे घोरपडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बदलापूर पूर्वेकडील शहराध्यक्ष रमेश सोळसे, प्रशांत कुलकर्णी, अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष विराज देशमुख, उत्तम विशे, दिनेश कथोरे, सूरज मुठे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकर भोईर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com