

नवीन मार्गिकेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
पनवेल-सोमटने, चिखली प्रकल्पासाठी ४४४.६४ कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई उपनगरी रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाची भर घालणाऱ्या पनवेल कॉर्ड लाइन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखलीदरम्यान सुमारे ७.५४ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र रेल्वेमार्ग विकसित करण्यात येणार असून, यासाठी अंदाजे ४४४.६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी मध्य रेल्वे करणार आहे.
पनवेल हे हार्बर मार्गावरील प्रमुख टर्मिनल असून, हे दिवा, रोहा, जेएनपीटी आणि कर्जत या महत्त्वाच्या मार्गांशी जोडलेले आहे; मात्र सद्यस्थितीत ग्रेड-सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सल करावे लागते, ज्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात विलंब निर्माण होतो आणि परिचालनावर परिणाम होतो; मात्र आता पनवेल कॉर्ड लाइन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली आहे. पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली यादरम्यान सुमारे ७.५४ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. या दोन्ही नव्या रेल्वेमार्गामुळे रेल्वेचे जाळे अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल, प्रवासी रेल्वेगाड्यांच्या गतीत सुधारणा होईल, इंजिन रिव्हर्सलची गरज दूर होईल, तसेच मालवाहतूकही सुरळीत आणि वेगवान होईल. एकंदरीत, हा प्रकल्प मुंबई विभागातील रेल्वेसेवेला आधुनिक आणि गतिशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दोन महत्त्वाच्या कॉर्ड लाइन्स
दिवा-पनवेल मार्गावरील फ्लायओव्हरद्वारे जेएनपीटी-कर्जत कॉरिडॉरशी जोडणारी कॉर्ड लाइन
काळंदुरीगाव केबिन ते सोमटणे स्थानकदरम्यान प्रस्तावित दुसरी कॉर्ड लाइन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.