शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत समाज कल्याण मुंबई विभाग अग्रेसर

शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत समाज कल्याण मुंबई विभाग अग्रेसर
Published on

शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत समाज कल्याण मुंबई विभाग अग्रेसर
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निकालामध्ये समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक स्तरावर मुंबई विभाग कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे, तर सहाय्यक आयुक्त स्तरावर रत्नागिरी कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
स्वच्छ कार्यालय, अभ्यागतांसाठी सुसज्ज अभ्यागत कक्ष, योजनांचे दिशादर्शक माहिती फलक, नावीन्यपूर्ण योजना, नागरिकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा इत्यादी निकषावर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी या कार्यालयाने बाजी मारली. यापुढेसुद्धा समाज कल्याण विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब साळुंके यांनी दिली.
प्रशासकीय सुधारणा मोहिमेमध्ये समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयांनी तसेच मुंबई विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com