कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व कामगारनेते महेंद्र घरत यांच्याकडे द्या

कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व कामगारनेते महेंद्र घरत यांच्याकडे द्या
Published on

कोकणातील काँग्रेसचे नेतृत्व महेंद्र घरत यांच्याकडे द्या
‘टिळक भवन’ येथे कोकणातील जिल्हाध्यक्षांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : रायगडचे भाग्यविधाते अ. र. अंतुले काँग्रेसचे कणखर नेते होते, परंतु त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली; मात्र महेंद्र घरत यांनी रायगडमध्ये काँग्रेस मजबूत केली आहे. रायगडचे डॅशिंग नेते म्हणून महेंद्र परिचित आहेत. त्यामुळेच निष्ठावान नेते म्हणून महेंद्र घरत हेच कोकणात समर्थपणे काँग्रेस नेतृत्वाची धुरा सांभाळू शकतात, त्यामुळेच कोकणातील काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्र घरत यांच्याकडेच द्या, अशी प्रमुख मागणी कोकण विभागातील जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्राचे सहप्रभारी (कोकण विभाग) यू. बी. व्यंकटेश यांच्याकडे केली. या मागणीला बैठकीतील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागाची बैठक शुक्रवारी (ता. २३) टिळक भवन मुंबई येथे झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी महाराष्ट्र सहप्रभारी कोकण विभाग यू. बी. व्यंकटेश यांचे स्वागत केले. या बैठकीला कोकणचे निरीक्षक राजेश शर्मा, उपाध्यक्ष गणेश पाटील, राजन भोसले, मिलिंद पाडगावकर, तसेच काँग्रेसचे कोकणातील सुमारे २०० पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याबाबत या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांच्या ध्येयधोरणानुसार जिल्हाध्यक्षांना अधिकार मिळायला हवेत. आम्ही ताकदीने लढायला तयार आहोत. आमचे कार्यकर्तेही सक्षम आहेत.’’
ठाणे, पालघर, रायगड, भिवंडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी कोकणातील जिल्हाध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली. ठाणे ग्रामीणचे दयानंद चोरघे म्हणाले, ‘‘काँग्रेस भक्कम आहे, फक्त आम्हाला अधिकार द्या.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com