

अभ्यासिका, नोकरी प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण
मुंबई, ता. २४ ः गोरेगाव पश्चिमेतील अण्णा भाऊ साठे क्रीडा संकुलात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका, धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकरी प्रशिक्षण केंद्रांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यात क्रीडा संकुलातील लाल मातीचा कुस्तीचा आखाडा व इतर सोयीसुविधांचे लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांनी केले. शिवसेना नेते संजय निरुपम आणि प्रा. संजय मोरे यांच्या प्रयत्नातून या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
या वेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मुंबईतील भूमिपुत्र, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय विभागात नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम, प्रा. संजय मोरे यांचे कौतुक केले. सगळेच संजय हे चांगले नसतात असे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
याप्रसंगी खासदार रवींद्र वायकर, आमदार मुरजी पटेल, संजय निरुपम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.