

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : नेरूळ येथील शनी मंदिरसमोरील पदपथावर १२ मे रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख न पटल्याने नेरूळ पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच त्याच्या नातेवाइकांचा शोध सुरू केला आहे.
नेरूळ येथील शनी मंदिर परिसरातील पदपथावर १२ मे रोजी अंदाजे ५० वर्षे वयोगटातील एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी त्याला महापालिका रुग्णालयात दाखल केले होते; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या व्यक्तीजवळ त्याची ओळख पटविण्यासारखी कुठलीही वस्तू आढळून न आल्याने पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मृत व्यक्ती अंदाजे ५० वयोगटातील असून, तो सावळ्या रंगाचा आहे. त्याच्या अंगात लाल रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट आहे. डाव्या हातात पांढऱ्या रंगाचे घड्याळ आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी नेरूळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.