

ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को)मार्फत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत दोनदिवसीय तपासणी शिबिराला शनिवारी (ता. २४) सुरुवात झाली. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. या शिबिरात प्रमाणपत्रधारक अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, कर्णबधिर, पूर्णतः अंध अशा दिव्यांग बांधवांसाठी तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेनुसार विविध सहाय्यक साहित्य तपासणीनंतर मोफत प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्यांमध्ये तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरी संचालित मोटराईज्ड सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, सीपी चेअर, श्रवणयंत्र, ब्रेल साहित्य, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, कमोड खुर्ची, ट्रायपॉड, ग्रीवा कॉलर, डेन्चर, एल. एस. बेल्ट इत्यादींचा समावेश आहे. उपस्थित डॉक्टर व एलिम्को स्टाफमार्फत पात्र लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून साहित्य वितरणाबाबत निर्णय घेतला जात आहे. शिबिरात सहभागी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आमदार राजेश मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हा महिला संघटक लता पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील व राजेश कदम, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या कविताताई गावंड, तालुकाप्रमुख महेश पाटील, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, माजी नगरसेवक संजय पावशे, शहर सचिव संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.