

बेकायदा बांधकामाविरुद्ध बेमुदत उपोषण
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : डोंबिवलीतील आयरे गावातील पालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाने अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या बंगल्यावर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने तक्रारदार महिलेने पालिका मुख्यालयासमोर शुक्रवारी (ता. २३) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ होत आहे.
अलका म्हात्रे, शरद म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आयरे गावातील एका जमिनीवर एका महिलेने बेकायदा बंगल्याची उभारणी केली आहे. या बंगल्याच्या बांधकामाविषयी आपण मागील दोन वर्षांपासून पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभाग उपायुक्त व ग प्रभाग सहाय्यक आयुक्तांकडे तक्रारी करत आहोत. या तक्रारींमुळे
पालिकेने संबंधित बंगला बेकायदा म्हणून घोषित केला आहे. बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याने पालिकेने ते तोडावे, यासाठी पालिका आयुक्तांपासून ते ग प्रभागापर्यंत सतत दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत, पण आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असे तक्रारदार अलका म्हात्रे यांनी सांगितले.
कारवाई होणार असल्यामुळे यापूर्वीचे आपण निश्चित केलेले बेमुदत उपोषण स्थगित केले होते. कारवाईचे आश्वासन देऊन, कारवाईची तारीख निश्चित करून पालिका, पोलिस त्या बांधकामांवर कारवाईच करत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने आपण या महत्त्वपूर्ण विषयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण येथे पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत बेकायदा बंगल्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असे तक्रारदार आणि उपोषणकर्त्या अलका शरद म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितले. ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी पोषणकर्ते यांची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले; मात्र उपोषणकर्त्या महिलांनी कारवाई झाल्यावरच उपोषण सोडणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.