

अर्धवट रस्त्याचे एक कोटी बिल अदा
उल्हासनगर सार्वजनिक बांधकाम विभाग अडचणीत
उल्हासनगर, ता. २४ (बातमीदार) : अर्धवट सोडलेल्या रस्त्याचे एक कोटी रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभाग अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी हा प्रकार आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे पुराव्यानिशी सादर केला असता संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कॅम्प नंबर ३ येथील पॅनल क्रमांक १२ गुलराज टॉवर ते वडोलगाव पूलापर्यंत रस्ता अद्यापही पूर्णपणे बनलेला नाही. तरीदेखील त्या रस्त्याचे तत्कालीन शहर अभियंत्याने ठेकेदाराला एक कोटीचे बिल अदा केल्याचा आरोप शिवाजी रगडे यांनी पुराव्यानिशी सादर केला. त्यानंतर आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या दालनात उपायुक्त विशाखा मोटघरे, शहर अभियंता हनुमंत खरात, कार्यकारी अभियंता संदीप जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कमलेश निकम, शिवाजी रगडे यांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ठेकेदाराला तत्काळ काम सुरू करण्याची नोटीस काढण्याचे आदेश देत काम करण्यास दिरंगाई केल्यास काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे सुनावले. तसेच, संबंधित अभियंत्यालाही निलंबित करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.