खारघरमध्ये मोकाट डुकरांचा सुळसुळाट

खारघरमध्ये मोकाट डुकरांचा सुळसुळाट
Published on

खारघरमध्ये मोकाट डुकरांचा सुळसुळाट
खारघर, ता. २५ (बातमीदार) : खारघर सेक्टर १६ मधील खेळाच्या मैदानात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. डुकरांमुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खारघर सेक्टर १६ मधील रहिवासी आणि मुलांना विविध खेळ खेळता यावे, यासाठी सिडकोने मैदान उपलब्ध करून दिले आहे, मात्र गेल्या आठवडाभरापासून मैदानात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. सकाळ-संध्याकाळ रानटी डुकरी मैदानाचा ताबा घेत असल्यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मैदानापासून काही अंतरावर असलेल्या एसटीपी प्लॉटच्या मागील बाजूला वराह पालन केले जात आहे. या वराह पालन करणाऱ्या व्यक्तीला परिसरातील राजकीय व्यक्तींचा पाठबळ असल्यामुळे डुकर थेट मैदानासह वसाहतीत सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या अवकाळीमुळे सर्वत्र चिखल झाला आहे. त्‍यातच डुकरांच्‍या वावरामुळे परिसरात आजार पसरण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे पालिकेने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही, तर सेक्टर १६ मधील मैदानात १५ ते २० मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. भीतीपोटी लहान मुले खेळण्यास मैदानात येत नाहीत. याविषयी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रार केली, मात्र काही उपाययोजना केली जात नसल्याचे जय हिंद क्रिकेट क्रीडा मंडळाचे पदाधिकारी कृष्णा खडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com