

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : जमिनींची मोजणी आणि सर्वेक्षण करण्याचे काम भूमापन व भूमी अभिलेख कार्यालयाकडून केले जाते, मात्र हे कार्यालय ठाण्यामध्ये असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, यासाठी हे कार्यालय मिरा-भाईंदरमध्ये सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
मिरा-भाईंदर शहर वेगाने वाढत असून, त्याची लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. येथील नागरिकांना, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यासाठी भूमापन व भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो व त्यांची वेळ घ्यावी लागते, मात्र हे कार्यालय ठाणे येथे आहे. त्यामुळे लोकांचा वेळ व पैसा खर्च होतोच, शिवाय अनेक अडचणी येतात. हे कार्यालय मिरा-भाईंदरमध्ये सुरू झाल्यास लोकांचा मनस्ताप कमी होणार आहे. यासाठी हे कार्यालय मिरा-भाईंदरमध्ये सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात, तसेच कार्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ॲड. व्यास यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.