पालघर क्रीडा अधिकारी कार्यालय तिसरे

पालघर क्रीडा अधिकारी कार्यालय तिसरे
Published on

पालघर, ता. २५ (बातमीदार) : राज्य सरकारच्या सात कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. आदिवासी जिल्हा व नवीन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडा विभागाने क्रीडा क्षेत्रात राज्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

पालघर जिल्हा आदिवासीबहुल आहे. स्थानिक खेळाडूंना पुढे आणण्याकरिता डहाणू आणि जव्हार प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट चाचणीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण ३८ हजार विद्यार्थ्यांची निवड चाचणी झाली. यामधून तीन हजार २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एम्स स्पोर्टस फाउंडेशनच्या माध्यमातून आश्रमशाळांना २० हजारांचे क्रीडा साहित्य देण्यात आले.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलाच्या निर्मितीचा मानस असून, जिल्ह्याच्या ठिकाणी २५ कोटी खर्चून जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती सुरू आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. २०२२-२३ मध्ये पालघर जिल्ह्याचे शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग हा केवळ २२ हजार होता. तो २०२३-२४ मध्ये ३८ हजार, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये जवळपास ६५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.

पालघर जिल्ह्यामध्ये आजतागायत राज्यस्तरीय क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, स्केटिंग आदी स्पर्धा आयोजनाचा मान मिळालेला आहे. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये व्हॉलीबॉल आणि स्केटिंग या राष्ट्रीय स्पर्धा शिबिरांचे आयोजनदेखील करण्याचा बहुमान जिल्ह्याला मिळाला होता.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खेळाचा विकास व्हावा, यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक आणून त्यांना प्रशिक्षित करणार आहोत. २०३२ च्या ऑलिम्पिकमध्ये आपला खेळाडू खेळेल, या दृष्टीने प्रयत्न असणार आहेत.
- इंदुराणी जाखड, अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद

पालघर जिल्ह्यामधील खेळाडू, शिक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्य सरकारच्या उपक्रमामुळे बहुमान मिळालेला आहे, तो नक्कीच प्रोत्साहित करणारा असेल. श्वास क्रीडा, ध्यास क्रीडा या उक्तीप्रमाणे या जिल्ह्यातून ऑलिंपिक खेळाडू नक्की घडतील.
- सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com