ठाण्यात बांग्लादेशी महिला जेरबंद

ठाण्यात बांग्लादेशी महिला जेरबंद
Published on

ठाण्यात बांगलादेशी महिला जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : श्रीनगर पोलिसांनी एका ३७ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. ही महिला चार महिन्यांपासून ठाण्यात राहात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनगर पोलिसांना एक बांगलादेशी महिला त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. २३) सापळा रचून त्या महिलेला पडवळनगर परिसरात ताब्यात घेतले. दरम्यान, चौकशीत तिच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे तिने कबुली दिली. ही महिला बांगलादेशी नागरिक असून, ती घुसखोर असल्याचे निष्पन्न झाल्यावर तिला अटक केली. या वेळी तिच्याकडे एक मोबाईल सापडला. तसेच तिच्याविरोधात परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १३,१४ अ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विशाल मिंडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com