

दोन दिवसांत ३३५ टन कचऱ्याचे संकलन
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ड प्रभागात दोनदिवसीय राबविण्यात आलेली विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी ठरली. कल्याण पूर्व येथील आत्माराम नगर परिसर, कमलादेवी महाविद्यालय मागील भाग, साईबाबा मंदिर गुजराती चाळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानासमोरील परिसर आणि मंगेशी संस्कार परिसरातील ३३५ टन कचरा उचलण्यात आला. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी ही संपूर्ण मोहीम सुमित एल्कोप्लास्ट या घनकचरा व्यवस्थापन एजन्सीमार्फत राबविली.
रात्रपाळीतील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य नियोजन, यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा समन्वय साधण्यात आला होता. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभाग क्षेत्र डचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, सुमित एल्कोप्लास्टचे सानु वर्गीस, प्रवीण भोईर, युनिट ऑफिसर विकास सोनवणे व सुपरवायझर यांनी विशेष मेहनत घेतली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम वेळेत आणि गुणवत्तेने पार पडली. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून, स्थानिक रहिवाशांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि कर्मचारीवर्गाच्या मदतीने परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी झाला आहे, अशी माहिती ड प्रभागाचे सहा. आयुक्त उमेश यमगर यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.