कावेसर तलावासह उद्यानाचा होणार कायापालट

कावेसर तलावासह उद्यानाचा होणार कायापालट

Published on

कावेसर तलावासह उद्यानाचा होणार कायापालट
पर्यावरणप्रेमींनी मागितला सुशोभीकरणाचा आराखडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : कावेसर तलावासह परिसराचा कायापालट होणार असून, या कामाचे भूमिपूजन खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत झाले. येथील सुशोभीकरणामुळे पाणथळ तलावाची जैवविविधता धोक्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करीत ठाणे ग्रीन कलेक्टिव्हने सुशोभीकरणाचा आराखडा मागितला आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी झालेल्या निवडणुकीत कावेसर तलावातील उद्यानाच्या सुशोभीकरणाचे वचन दिले होते. त्यानुसार रविवारी (ता. २५) भूमिपूजन झाले. साडेपाच एकर जागेवरील या उद्यानातील हिरवळीला कोणतीही बाधा न आणता केवळ १० टक्के भागाचा विकास करणार आहे. पायवाटेवर पदपथांची निर्मिती तसेच ओपन जिम, योगसाधना आणि झुंबा व इतर गायन, वादनाच्या हौशी कलाकारांसाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.
----------------------------
फुलपाखरू उद्यान
या परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवळ असल्याने फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करणार असल्याची माहिती म्हस्केंनी दिली. तसेच तलाव आणि उद्यानामध्ये स्कायवॉच टॉवर उभारला जाणार आहे.
------------------------------
काठांचे कॉँक्रीटीकरण नाही
तलावाच्या सुशोभीकरणावर ठाणे ग्रीन कलेक्टिव्हने संशय व्यक्त केला असून, पालिकेने आतापर्यंत तलावांचे सुशोभीकरण करताना पर्यावरणाची हानी केल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. कावेसर तलाव हा दीडशे वर्षे जुना असून येथे पाणथळ जागा आहे. तलावाच्या काठांचे अद्याप काँक्रीटीकरण झाले नाही. त्यामुळे येथील जैवविविधता अजून टिकून आहे. आजही या तलावात ४० ते ५० प्रकारचे जलचर जीव असून, स्थलांतरित पक्ष्यांचे थवे येथे दरवर्षी येतात.
------------------------------
शंकांचे निरसन
समाजमाध्यमांमधून उद्यानाच्या उभारणीबाबत काही गैरसमज पसरविले होते, असा दावा करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाचे मोठ्या स्क्रीनवर सविस्तर सादरीकरण करून शंकांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या वेळी झाला. तसेच नरेश म्हस्के यांनीही रहिवाशांशी संवाद साधत प्रकल्पाचे काम समजावून सांगितले. गैरसमजाचे निराकरण झाल्याने उपस्थित रहिवाशांनी उद्यान सुशोभीकरणाचे स्वागत केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com