

पोलिसांनीच कायद्याची हत्या केली
जमील शेख हत्याप्रकरणी डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ‘राबोडी येथील कार्यकर्ता जमील शेख याच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या मारेकऱ्याने जाहीरपणे नाव घेतल्यानंतरही पोलिस कारवाई करीत नाहीत; एवढेच काय, कोर्टाच्या आदेशानंतरही पोलिस मुख्य सूत्रधाराला अटक करीत नाहीत. हा प्रकार म्हणजे पोलिसांकडूनच कायद्याची हत्या करण्यासारखे आहे.’ असा आरोप आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राबोडी येथील मनसेचे कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलीला दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळाल्याबद्दल डाॅ. जितेंद्र आव्हाड हे तिचे कौतुक करण्यासाठी जमीलच्या घरी गेले होते. याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे आरोप केले. ते म्हणाले, ‘पोलिसांच्या चौकशीवरच आम्हाला विश्वास नाही. एफआयआरमध्ये नाव असताना ते आरोपपत्रातून गायब केले जाते, असे नाव गायब करणे कायदाबाह्य आहे. म्हणून पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. मारेकरी सुपारी देणाऱ्याचे नाव सांगत असतानाही पोलिस सूत्रधाराला अटक करीत नाहीत, हे चौकशी अधिकारी आणि गुन्हेगारांची हातमिळवणी झाल्याचेच द्योतक आहे. हे अधिकारी आणि आरोपी एकमेकांना भेटत होते, हे मोबाईल टाॅवर लोकेशन तपासल्यावर स्पष्ट होईल.’
...
मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी
‘जमील शेखच्या दोन्ही मुली प्रचंड हुशार आहेत. पैशांअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आपण आणि सुहास देसाई यांनी दहावी पास झालेल्या मुलीच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचे ठरविले आहे,’ अशी माहिती या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.