

मुंब्र्यात रेतीमाफियांवर कारवाई
५० लाखांचा मुद्देमाल नष्ट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ ः मुंब्रा खाडीत रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेले बार्ज आणि संक्शन पंप खाडीमध्येच बुडवून नष्ट केले आहेत. याची किंमत अंदाजे ५० लाख रुपये इतकी आहे.
ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीपात्रातून यापूर्वी डुबी पद्धतीने रेतीउपसा केला जात होता. दरम्यान, आता डुबी रेतीउपसा पद्धत बंद झाली असून, आता संक्शन पंपाद्वारे बेकायदा रेतीउपसा करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे खाडीपात्राला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अशा रेतीउपसा करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जाते. आठवडाभरापूर्वीच कळवा येथील खारेगाव भागातील रेतीबंदर खाडीत रेतीउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती; परंतु यानंतरही रेतीउपसा थांबलेला नसल्याची बाब पुन्हा एकदा पुढे आली आहे.
मुंब्रा रेल्वे पुलाजवळ असलेल्या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या महसूल आणि तहसील विभागाने येथे कारवाई केली. या कारवाईमध्ये पथकाने मुंब्रा ते कल्याणदरम्यान रेल्वे रुळाजवळील खाडी परिसरात गस्त घातली. या गस्तीदरम्यान दिवा खाडीमध्ये एक बोट (बार्ज) आणि संक्शन पंपाच्या साह्याने अवैधपणे रेती उत्खनन होत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने तात्काळ हस्तक्षेप करीत सदर बार्ज आणि संक्शन पंप खाडीमध्ये बुडवून नष्ट केले. याची किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. या संयुक्त कारवाईमुळे खाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेतीउपशावर मोठा आळा बसणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे. रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.