एसएसटी महाविद्यालयात दिमाखात पार पडला पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

एसएसटी महाविद्यालयात दिमाखात पार पडला पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
Published on

एसएसटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात
कल्याण, ता. २५ मे (वार्ताहर) : एसएसटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील या मोलाच्या टप्प्यावर महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव करीत एक संस्मरणीय सोहळा साजरा केला.
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याला आमदार सुलभा गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच विशेष अतिथी म्हणून शाह अँड अँकर कच्छी इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबईच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या असोसिएट डीन डॉ. नम्रता कोमिनेमी, ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफले तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी आमंत्रित होते.
डॉ. कोमिनेमी यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने कौशल्य वाढवण्याचा आणि अपयशालाही सामोरे जाण्याचा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत महाविद्यालयाशी असलेले संबंध पुढेही राहतील, या भावना व्यक्त करीत भविष्यातही महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबवीत असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत अध्यापन, स्पर्धा आणि मार्गदर्शनातून मिळालेल्या आत्मविश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा समारंभ विद्यार्थ्यांच्या यशाला दाद देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com