जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी

Published on

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी
आजपासून कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
वाणगाव, ता. २६ (बातमीदार) : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी पदविका शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. जव्हार, वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर, कासा, वाणगाव, चिंचणी येथील हजारो विद्यार्थ्यांनी कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथून कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. विशेष म्‍हणजे शेतीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या दुर्मिळ पिकांची लागवड करून अनेकजण यशस्वी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात शेती व्यवसायास वाव असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राकडे वळावे, असे कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य संस्थापिका सोनालिका पाटील यांनी आवाहन केले आहे. सोमवार २६ मेपासून कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
डहाणू तालुक्यातील वाणगाव आसनगावमधील वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान, संस्थेच्या कृषी तंत्र विद्यालयात दोनवर्षीय मराठी माध्यमासाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस २६ मेपासून सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातील एकमेव अ श्रेणी दर्जा प्राप्त असलेले व गतवर्षी विद्यापीठाने अधिक तुकडी वाढीसाठी मान्यता मिळवली आहे. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २६ मे ते २७ जूनपर्यंत ऑफलाइन पद्धतीने विद्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे, तरी जिल्ह्यातील कृषी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा, असे कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य सोनालिका पाटील यांनी आवाहन केले आहे. पालघर जिल्ह्यात मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड, तलासरी, वसई, पालघर या तालुक्यात एकही कृषी शिक्षणाचे विद्यालय नसल्याने डहाणू तालुक्यातील वाणगाव मधील कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होते. अनेक विद्यार्थी कृषीच्या प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लवकरच आपला प्रवेश निश्चित करावा, असे गुरुकुल शिक्षण संस्‍थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सांगितले.
......
पात्रता :
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, तसेच बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील.
..................
शासनाची सुविधा :
एसटी, एससी, एनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शासनाची शिष्यवृत्ती तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के शासनाची शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे. तरी नमूद केलेल्या मुदतीमध्ये प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्राचार्य सोनालिका पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com