नातेवाईकांचे लग्न पडले दीड लाखांना
लग्नात मंगळसूत्राची चोरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : नातेवाइकांचे लग्न असल्याने हॉलच्या बाजूच्या हॉटेलमध्ये घेतलेली रूम एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. त्या रूममध्ये कपड्याच्या बॅगेत ठेवलेले दीड लाखांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहेत. ही घटना शनिवारी (ता. २४) घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार नौपाड्यातील भास्कर कॉलनी राहणाऱ्या आहेत. त्यांच्या नातेवाइकांमध्ये शनिवारी एकाचे लग्न लुईसवाडी येथील शहनाई हॉलमध्ये होते. म्हणून त्या कुटुंबाने हॉलच्या बाजूच्या हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती. त्या रूममध्ये कुटुंबातील नातेवाईक आणि दोन मेकअप करणाऱ्या दोन महिलांची ये-जा सुरू होती. त्यातच तक्रारदार दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास परत हॉटेलच्या रूमवर परत आल्या होत्या. त्यातच दुपारनंतर रिसेप्शन आल्याने त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून कपड्याच्या बॅगेमध्ये ठेवले होते. पुन्हा कपडे बदलून तक्रारदार रिसेप्शनसाठी हॉल येथे जवळपास तासाभराने गेल्या. रिसेप्शन संपल्यानंतर सायंकाळी ६च्या सुमारास रूममध्ये आल्यावर कपड्याच्या बॅगेमध्ये ठेवलेले ३२ ग्रॅम वजनाचे दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र बॅगेत त्यांना मिळून आले नाही. असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

