नवजात बालकाची विल्‍हेवाट लावताना बेड्या

नवजात बालकाची विल्‍हेवाट लावताना बेड्या

Published on

नवजात बालकाची विल्‍हेवाट लावताना बेड्या
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः अनैतिक संबंध ठेवताना माणूस नातीगोती बघत नाही. असाच प्रकार भांडुप भागात घडला आहे. सख्ख्या मावशीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची विल्हेवाट लावण्यासाठी निघालेल्या एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. भांडुप येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही माहिती दिली. या तरुणाने घरातच मावशीची प्रसूती केल्याचे उघड झाले आहे. लोकांना याबाबत कळू नये, यासाठी त्याने या नवजात बालकाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. तो रिक्षातून अर्भकाला घेऊन जात असताना विक्रोळी गांधीनगर येथे ड्युटीवर असलेले पोलिस अंमलदार सतीश ससाणे यांना संशय आला. त्यांनी त्या रिक्षाची तपासणी केली असता एका कापडात हे नवजात भ्रूण गुंडाळून नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तरुणाला अटक केली. पार्कसाईट पोलिस ठाण्यात घेऊन आले आणि अधिक माहिती घेतली. हे नवजात बाळ व त्याच्या आईला उपचारार्थ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पार्कसाईट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद सानप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com