सायबर भामट्यांनी महिलेला २३ लाखांना गंडवले
सायबर भामट्यांनी महिलेला २३ लाखांना गंडवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या साथीदाराला पकडून देण्यात मदत करणारी महिला सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली. या महिलेची २३ लाख रुपयांना फसवणूक केली आहे. अभिनेत्री करिना कपूरची बनावट गुंतवणूक जाहिरात दाखवून भामट्यांनी तिला गंडवले. पश्चिम विभाग सायबर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
तक्रारदार महिला वांद्रे पश्चिम भागात राहत असून ती सामाजिक कार्यकर्ती आहे. सोशल मीडियावरील एक्स ॲपवर गुंतवणुकीसंदर्भात एक लेख तिच्या वाचनात आला. यात अभिनेत्री करिना कपूर आणि गायिका श्रेया घोषाल यांच्या गुंतवणुकीसंदर्भात बनावट जाहिराती होत्या. या महिलेने त्यात देण्यात आलेली लिंक ओपन केली. त्यानंतर, लगेचच तिला शाशा नावाच्या महिलेने काॅल केला व फाॅक्सोनेट नावाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीमधून बोलत असल्याचे तिने सांगितले.
या महिलेला कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यापासून ते गुंतवणूक करण्यास या महिलेला भुलवले. आरोपींनी महिलेचे आभासी ट्रेडिंग खाते उघडून सागर, माया आणि राघवसारख्या नावांचा वापर करीत आंतरराष्ट्रीय फोन नंबरद्वारे तिच्याशी संपर्क साधला होता. पीडित महिलेने २५ एप्रिल ते ६ मेदरम्यान एकूण २३ लाख ४५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीतील केवळ एक लाख ६३ हजार रुपये तिला काढता आले. उर्वरित रक्कम काढता आली नाही. पुढे आणखी पैशांची मागणी झाल्याने या महिलेला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

