पुण्यातून ठाण्यात गांजाची तस्करी
ठाणे, ता. २७ : पुणे-चिंचवड येथून ठाण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून १० किलो १३४ ग्रॅम वजनाच्या गांजासह रोख रक्कम असा एक लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाण्यातील खोपट येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकावर दोन महिला गांजाविक्रीकरिता पुण्यावरून ठाण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे कक्षेला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (ता. २४) रात्री वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने सापळा रचून रेणुका शर्मा (३७) आणि संगीता राठोड (४२) यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांचाकडे एक लाख ६० हजारांचा १० किलो १३४ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला होता. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

