सहज, सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान

सहज, सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान

Published on

ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार)ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडित विविध शासकीय योजना काढलेल्या आहेत; मात्र एकत्रितरीत्या त्या उपलब्ध नसल्याने समाजातील गरीब वंचित घटकांची गैरसोय होत असल्याने ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘ओळख व हक्क अधिकाऱ्याची’ या कायदेविषयक माहिती देणाऱ्या सोप्या भाषेतील पुस्तकाची निर्मिती केली आहे.
‘न्याय सर्वांसाठी सारखाच’ हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीमार्फत कायदेविषयक जनजागृतीचे कार्य करते. दुर्गम भाग, वाड्या, वस्त्या, तुरुंग, शाळा, महाविद्यालयात कायदेविषयक शिबिरातून विविध योजनांची माहिती सोप्या भाषेत दिली जात आहे; मात्र तरीदेखील योजना आणि शासकीय परिपत्रकाची भाषा कळत नसल्याने ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश एस. एस. शिंदे, जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्या हस्ते झाले. जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीमध्ये पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाला विविध मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रभर विक्री होणाऱ्या पुस्तकात जनजागृतीसाठी प्रसिद्ध झालेल्या दैनिक ‘सकाळ’मधील बातम्यांचा समावेश करण्यात आला आहे.
-----------------------------------------------
‘या’ बाबींचा पुस्तकात समावेश
या पुस्तकात विधी सेवा प्राधिकरण रचना व कार्ये, वैकल्पिक वाद निवारण पद्धती, मनोधैर्य योजना, फौजदारी गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तीकरिता नुकसानभरपाई योजना, महाराष्ट्र लैंगिक अत्याचार / इतर गुन्ह्यांमधील पीडित / त्यातून बचावलेल्या महिलांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना २०२२, हीट अँड रन मोटार अपघात नुकसानभरपाई योजना, न्याय चौकशी अधीन बंदीचे अधिकार व जामिनावर मुक्तताबाबत तरतुदी, न्यायाधीन बंदी पुनरावलोकन समिती, कारागृहातील वंचित व गरीब बंद्यांना सहाय्यभूत योजना, विधी सहाय्य बचाव पक्ष प्रणालीबाबत माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com