महावितरणची यंत्रणा सतर्क

महावितरणची यंत्रणा सतर्क

Published on

कामोठे, ता. २७ (बातमीदार) : राज्यभरात सुरू झालेल्या पहिल्याच पावसात सरकारी यंत्रणांची धावपळ उडाली. कामोठ्यात सरकारी यंत्रणांनी मॉन्सूनपूर्व कामांचे केलेले दावे फोल ठरले आहेत. खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक नेहमीच त्रस्त असतात. त्यामुळे पावसाळ्यात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सजग असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
कामोठे नोडमध्ये सुमारे ५७ हजार वीजग्राहक आहेत. जव्हार शाखेमार्फत १ ते १६ सेक्टरमधील २५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा होतो. कामोठे शाखेच्या कार्यकक्षेत सेक्टर १७ ते ३६ मधील ३२ हजार ग्राहक आहेत. महावितरण कंपनीने सेक्टर ९ येथे उपकेंद्र उभारले आहे. या उपकेंद्राला खारघर येथील अतिउच्च दाब केंद्रातून विजेचा पुरवठा केला जात आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे जव्हार शाखेतील उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत आहे. उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी अपेक्षित वेळेपूर्वी कोसळधार पावसामुळे यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. कामोठ्यात दरवर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या वाढत्या प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
----------------
दुरुस्तीची कामे निरंतर
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचा दावा केला आहे. यंत्रणेतील विविध कारणांमुळे वीजपुरवठा करण्यासाठी व्यत्यय येत असतो. बिघाड मोठा असल्यास वेळ लागण्याची शक्यता महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पावसाळी कामांतर्गत विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढणे, विद्युतवाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन केले जात असल्याची माहिती दिली.
---------------
अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे सदैव प्रयत्न सुरू असतात. यंत्रणेतील बिघाड शोधून बिघाड झालेली उपकरणे, वाहिनी सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे. तक्रार नोंदणीसाठी महावितरणच्या विविध ॲपचा वापर करावा.
- जितेंद्र माने, कार्यकारी अभियंता, महावितरण, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com