टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा जप्त

टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा जप्त

Published on

टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कारवाईदरम्यान २० लाख ९० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिस अधीक्षक यतिश देशमूख यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने गुटखामाफियांचे धाबे दणाणले.

मनोर, ता. २७
स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने गोपनीय माहितीनुसार महामार्गावर केलेल्या कारवाईत पाच लाख ९० हजार ९४० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथील हिंदुस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. कारवाईत टेम्पोसह वीस लाख ९० हजार ९४० रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदावर यतिश देशमूख विराजमान झाल्यानंतर अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारवाया सुरू झाल्याने गुटखामाफियांचे धाबे दणाणले आहे.

सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर गस्त घालत असताना चिल्हार फाटा येथिल हिंदुस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोत (GJ२१Y०७४४) गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रोहीत खोत आणि पोलिस अंमलदार वैभव जामदार यांनी दोन पंचांना सोबत घेत हिंदुस्थान ढाब्याच्या पार्किंगमधील टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधित सुपारी, तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. टेम्पोमध्ये पाच लाख ९० हजार ९४० रुपये किमतीचा सुंगधी सुपारी, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू आढळून आली. अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने टेम्पो जप्त करण्यात आला आहे. कारवाईत टेम्पोसह २० लाख ९० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १२३,२२३,२७४,२७५, सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६, कलम २६(२) (अ), २७ (२) (ई), २६ (२) (ओ), ३० (२), (ओ) सह मा. अन्न सुरक्षा सुरक्षा महाराष्ट्र राज्य अधिसचना शुक्रवार जुलै १२,२०२४/आषाढ २१ शके १९४६ दिनांक १२/०७/२०२४ रेग्युलेशन २०,२,३,४, ऑफ फुड सेप्टी ॲन्ड स्टॅडड ३,१,७.२०११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोचालक हितेश कुमार भगवानभाई प्रजापती (वय २८) रा. नवसारी गुजरात याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com